कर्नाटकमध्ये १२ वीच्या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !
शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची स्पष्टोक्ती !
(हिजाब – मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
बेंगळुरू (कर्नाटक) – इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्पष्ट करण्यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग नाही, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. परीक्षा देतांना हिजाब घालण्याची अनुमती मागणारी याचिका एका महिला अधिवक्त्याकडून सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळत होळीनंतर सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे. येत्या ९ मार्चपासून परीक्षा चालू होणार आहेत.