‘छत्रपती संभाजीनगर’ असे ‘स्टेटस’ ठेवल्याने धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !
धर्मांधांकडून घरावर दगडफेक
सिरसाळा (जिल्हा बीड) – येथे व्हॉट्सअॅपवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या कारणावरून येथील धर्मांधांच्या २२ जणांच्या गटाने रूपेश गायकवाड या हिंदु युवकावर आक्रमण केले. धर्मांधांनी हिंदु युवकाच्या घरावर दगडफेक करून घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रूपेश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेर शेख, शाहीद पठाण, सय्यद अजिज अनिस, अख्तर शेख, मुखीद मनियार, अरबाज शेख, अजिज सय्यद, नेहाल तांबोळी यांसह १२ जणांच्या विरोधात, तर १० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. धर्मांधांनी गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांच्या भावालाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपती संभाजीनगर शहराच्या नामकरणावरून चवताळलेल्या धर्मांधांचे खरे रूप ओळखा ! धर्मांधांना खरा इतिहासही स्वीकारायचा नाही, हेच यावरून लक्षात येते ! |