सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेली देवतांची भावार्चना !
मंगळवारी श्री गणेशाच्या दर्शनाला जाणे
साक्षात् श्री गुरुमाऊलींच्या कृपेमुळे आपण श्री गणरायाचे दर्शन घेत आहोत. आपण श्री गणरायाला दूर्वा आणि तांबडे पुष्प अर्पण करत आहोत. साक्षात् श्री गणराया आपल्याला आनंदरूपी मोदक देत आहे आणि आपण तो ग्रहण करत आहोत. आपण मन आणि बुद्धी गणरायाला अर्पण करत आहोत. आपण श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करत आहोत, ‘आमची बुद्धी सात्त्विक होऊ दे. आमच्याकडून श्री गुरूंचे आज्ञापालन तत्परतेने होऊ दे.’ त्या वेळी ‘श्री गणरायाचे चरण म्हणजे गुरुदेवांचे चरण आहेत’, असे आपल्याला जाणवत आहे.
– सद़्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३)