स्‍वतःच्‍या भूमीच्‍या विक्रीचा व्‍यवहार करतांना सरकारी कार्यालयात आलेला कटू अनुभव !

श्री. राम होनप

‘अन्‍य राज्‍यात माझ्‍या वडिलांच्‍या मालकीची एक शेतजमीन होती. ती त्‍यांना काही वर्षांपूर्वी एकाला विक्री करायची होती. त्‍या वेळी या व्‍यवहारासाठी आम्‍ही तेथील तहसील कार्यालयात गेलो होतो. या व्‍यवहाराची सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी सरकारी अधिकारी टाळाटाळ करत होता. हे काम करण्‍यासाठी त्‍याने आमच्‍याकडे साडेसात सहस्र रुपये मागितले. आम्‍हाला हे काम पूर्ण करण्‍यासाठी अन्‍य राज्‍यात परत परत जाणे आर्थिकदृष्‍ट्या परवडणारे नव्‍हते, तसेच त्‍यात साधनेचा वेळही वाया गेला असता. त्‍यामुळे आम्‍ही हे पैसे त्‍याला दिले.

त्‍या सरकारी अधिकार्‍याने पैशांची मागणी तोंडी न बोलता गणकयंत्रावर (कॅलक्‍युलेटरवर) ७ सहस्र रुपयांचे आकडे टाईप करण्‍याच्‍या माध्‍यमातून केली. याच व्‍यवहारासाठी सरकारी अधिकार्‍याने आम्‍ही ज्‍याला भूमी विकली त्‍याच्‍याकडून अडीच सहस्र रुपये मागितले. ते त्‍याने दिले. तो सरकारी अधिकारी यातील काही मोबदला त्‍याच्‍या वरिष्‍ठ सरकारी अधिकार्‍यांनाही देणार होता.

या प्रसंगी मनात विचार आले, ‘सरकारी अधिकार्‍यांनी एका व्‍यवहारात साडेनऊ सहस्र रुपये कमावले. तहसील कार्यालयात असे किती व्‍यवहार प्रतिदिन होत असतील ? आणि हे अधिकारी किती मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचारातून कमाई करत असतील ?’, भ्रष्‍टाचाराला कायमचा पायबंद करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना अपरिहार्य आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)

साधक, राष्‍ट्रप्रेमी आणि वाचक यांना आवाहन !            

भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा !  

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे. भ्रष्‍टाचारासंबंधी असे कोणतेही कटू अनुभव, तसेच आपल्‍या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्‍यास त्‍याविषयी आम्‍हाला त्‍वरित कळवा. ‘भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भात राष्‍ट्रासाठी काहीतरी करावे’, असे वाटणार्‍या हिंदूंनी आपले अनुभव आम्‍हाला पुढील पत्त्यावर पाठवावेत. तसेच त्‍या संदर्भात करावयाच्‍या मोहिमेत सहभागी व्‍हावे’, ही विनंती.

भ्रष्‍टाचार करणारे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची नावे उघड करण्‍यासाठी कृपया साहाय्‍य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्‍छा असल्‍यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. हिंदु राष्‍ट्रात केवळ सात्त्विक कर्मचारी आणि अधिकारी असतील.

आपले अनुभव कळवण्‍यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्‍यासाठी पत्ता

सुराज्‍य अभियान टपालाचा पत्ता – अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्‍लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क : ९५९५९८४८४४

संगणकीय पत्ता – socialchange.n@gmail.com