तुर्भे येथे राजकीय दबावामुळे अनधिकृत फेरीवाल्‍यांवरील कारवाई थांबली !

तुर्भे येथे राजकीय दबावामुळे अनधिकृत फेरीवाल्‍यांवरील कारवाई थांबली

तुर्भे – तुर्भे विभाग कार्यालयाच्‍या क्षेत्रात अनधिकृतपणे बसणार्‍या फेरीवाल्‍यांवर कारवाई करतांना राजकीय दबाव येत असल्‍याने ‘फेरीवाला हटाव मोहीम’ सध्‍या थांबली आहे. सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरी गाव आदी ठिकाणी पुष्‍कळ प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत.

१. तुर्भे विभाग कार्यालयाचे साहाय्‍यक आयुक्‍त म्‍हणून भरत धांडे यांनी पदभार स्‍वीकारल्‍यानंतर फेरीवाल्‍यांवर कारवाई चालू केली होती. यामुळे ए.पी.एम्.सी. फळ मार्केट ते भाजी मार्केट येथील पदपथ पादचार्‍यांसाठी मोकळा झाला आहे. अन्‍य काही ठिकाणीही नियमितपणे कारवाई चालू आहे.

२. कारवाईला स्‍थानिक राजकीय पक्षांच्‍या पदाधिकार्‍यांनी विरोध करत प्रशासनावर दबाव आणला आहे.

संपादकीय भूमिका

अनधिकृत गोष्‍टींना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष जनतेचे हित काय साधणार ?