साधकांचा आधारस्तंभ असलेल्या सद़्गुरु स्वाती खाडये यांची अलौकिक वैशिष्ट्ये !
आज फाल्गुन पौर्णिमा (७ मार्च २०२३) या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
साधकांना सद़्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी आलेल्या अनुभूती, त्यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्ट्ये, तसेच सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या वहिनीला (भावाच्या पत्नीला, सौ. मंजुषा मनोज खाडये यांना) त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सद़्गुुरु स्वाती खाडये यांच्या ४५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !
१. श्री तुळजाभवानी देवीने ‘सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या माध्यमातून मीच कार्य करत आहे’, असे सांगणे
‘२०.२.२०२२ या दिवशी मी तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा मला मंदिर परिसरात प्रवेश केल्यापासूनच सद़्गुुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण येत होती. त्यांच्या आठवणीने मला भावाश्रू येत होते. मी देवीच्या दर्शनाला आले होते; पण मला तिथे सद़्गुुरु स्वातीताईंचेच अस्तित्व जाणवत होते. मी देवीचे दर्शन घेत होते; मात्र मनात ‘सद़्गुुरु स्वातीताई’, असा नामजप चालू होता. मी देवीसमोर उभी असतांना माझ्या मनात सद़्गुरु स्वातीताईंचाच विचार येतो; म्हणून मला ते अयोग्य वाटले. तेव्हा सूक्ष्मातून देवीने मला सांगितले, ‘सद़्गुरु स्वातीताईंच्या माध्यमातून मीच कार्य करत आहे.’ त्या वेळी प्रथमच मला अंतरातून स्थिरता अनुभवता आली.’- अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली
२. सद़्गुुरु (कु.) स्वाती खाडये बोलत असतांना ‘त्यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीच बोलत आहे’, असे जाणवणे
सद़्गुुरु स्वातीताई भावसत्संगात प्रार्थना सांगतात. तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द अंतर्मनात जाऊन माझा भाव जागृत होतो. सद़्गुुरु स्वातीताई बोलत असतांना ‘त्यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीच बोलत आहे’, असे मला जाणवते. मी भावसत्संगाला जोडायला चालू केल्यापासून माझ्यावरील आवरण अल्प होऊन दिवसभर मला उत्साह जाणवतो आणि मला गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरणही अधिक वेळा होते. – एक साधिका, पुणे.
सद़्गुरु स्वाती खाडये यांची सर्वज्ञता !
१. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांच्या आईंची त्यांना भेटण्याची इच्छा ‘व्हिडिओ कॉल’ करून पूर्ण करणे
कोरोनाच्या कालावधीत सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) अनुमाने एक वर्ष घरी आल्या नव्हत्या. मे २०२१ मध्ये सद़्गुरु ताईंनी अकस्मात् मला ‘व्हिडिओ कॉल’ केला आणि त्यांनी सांगितले, ‘‘आईशी (श्रीमती (कै.) नलंदा खाडये (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्याशी) बोलायचे आहे.’’ त्या वेळी आईंनी त्यांना विचारले, ‘‘आता कधी भेट होणार ?’’ त्या वेळी सद़्गुरु ताईंनी सांगितले, ‘‘आता हिंदु राष्ट्रातच भेटू.’’
त्यानंतर १५ दिवसांनी त्यांच्या आईंचे (माझ्या सासूबाईंचे) निधन झाले. या प्रसंगातून सद़्गुरु ताईंची सर्वज्ञता लक्षात येते. आईंची सद़्गुरु ताईंना भेटण्याची इच्छा होती. ती सद़्गुरु ताईंनी ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून पूर्ण केली, तसेच त्यांनी आईंना पुढच्या प्रवासासाठी आश्वस्तही केले.
२. ‘सद़्गुरु स्वाती खाडये सतत जवळ आहेत’, असे जाणवणे
मला काही अडचण आल्यास किंवा माझ्या मनाची स्थिती ठीक नसल्यास, त्या वेळी सद़्गुरु ताईंचा भ्रमणभाषवर संदेश येतो किंवा त्यांचा भ्रमणभाष येतो. त्यानंतर माझ्या मनाच्या स्थितीत पालट होतो. ‘सद़्गुरु ताई सतत समवेत आहेत’, अशी मला अनुभूती येते. मला अडचणींची भीती वाटत नाही.
३. मी सद़्गुरु ताईंना काहीही न सांगता त्या अनेक वेळा माझ्या मनातील जाणतात.
४. सद़्गुरु स्वाती खाडये यांचा सहवास हवाहवासा वाटणे
सद़्गुरु ताईंची काही वैयक्तिक कामे करण्यासाठी मला त्यांच्या समवेत जावे लागते. अशा वेळी मला कधीही ताण येत नाही. मला त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो.’
– सौ. मंजुषा मनोज खाडये (सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या वहिनी), कुडाळ, सिंधुदुर्ग. (२२.२.२०२३)
आबालवृद्धांना प्रेमाने जोडून ठेवणार्या सद़्गुरु स्वातीताई !
‘सद़्गुरु स्वातीताई प्रसारदौर्यात साधकांची लहान मुले असतील, तर त्यांना जवळ घेऊन किंवा त्यांना मांडीवर घेऊन त्यांच्याशी बोलतात आणि त्यांना चॉकलेट देतात. त्या मुलांमध्ये काही कलाकौशल्य असल्यास ते आवर्जून जाणून घेऊन त्यांचे कौतुक करतात. त्या वयस्कर साधकांची पुष्कळ आदराने विचारपूस करून त्यांना आधार देतात. ‘त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना जमेल, अशी सेवा देऊन त्यातून त्यांची साधना होईल’, असे पहातात. माझ्या घरी माझ्या सासूबाई असतात. आमच्या घरी आल्यावर त्या आपुलकीने माझ्या सासूबाईंची विचारपूस करतात. त्या सर्वच साधकांच्या कुटुंबियांची आवर्जून विचारपूस करतात.’
– सौ. संगीता कडूकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कोल्हापूर
|