भारतात एक आठवड्यात कोरोनाचे रुग्ण तिप्पट
नवी देहली – देशात कोरोनाचे रुग्ण या आठवड्यात तिप्पट झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ घंट्यांत येथे ३२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी येथे ९५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. देशात आता एकूण कोरोनाचे २ सहस्र ७९१ रुग्ण नोंदवले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नोंदीनुसार देशात आतापर्यंत ४ कोटी ४६ लक्ष ८७ सहस्र ८२० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत अँटी कोविड -१९ या लसींचे २२०.६३ कोटी डोस दिल्याची नोंद झाली आहे.