भारतातील स्वित्झर्लंडच्या राजदूतांना देण्यात आली समज !
जिनेव्हा येथील भारतविरोधी भित्तीपत्रकांचे प्रकरण
नवी देहली – स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कार्यालयाबाहेर भारतविरोधी भित्तीपत्रके लावण्यात आल्याच्या प्रकरणी स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत राल्फ हेकनर यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून त्यांना समज देत विरोध दर्शवण्यात आला, अशी माहिती सूत्रांना दिली.
राल्फ हेकनर यांनी ‘भारताची भूमिका स्वित्झर्लंड सरकारला कळवण्यात येईल’, असे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. याविषयी सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकायापूर्वी भारताकडून असे कधी होत नव्हते. त्यामुळे हे चांगले लक्षण आहे. याप्रमाणे पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या संदर्भातही अशी किंवा त्याहून अधिक कठोर कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |