गुजरातमधील शक्तिपीठ असणार्या अंबाजीमाता मंदिरातील प्रसाद ‘मोहनथाळ’ बंद केल्याने वाद !
काँग्रेसने केला विरोध, भाविकांमध्येही अप्रसन्नता !
(‘मोहनथाळ’ म्हणजे बेसनपासून बनवलेली एक प्रकारची बर्फी)
कर्णावती (गुजरात) – ५१ शक्तिपीठांपैकी एक असणार्या गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजीमाता मंदिरातील ‘मोहनथाळ’ या प्रसादाचे वितरण बंद करण्यात आल्याने वाद चालू झाला आहे. नागरिकांकडून याविषयी अपसन्नता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने मोहनथाळ पुन्हा चालू करण्याची मागणी केली आहे, तर भाजपचा मोहनथाळीला अंतर्गत पाठिंबा आहे. आता या मंदिरात प्रसाद म्हणून चिक्की दिली जात आहे. जिल्ह्याधिकार्यांच्या आदेशातून मोहनथाळ बंद करून चिक्की प्रसाद म्हणून वाटण्यात येत आहे. (मंदिरामध्ये वर्षानुवर्षे काही प्रथा-परंपरा चालू असतात. मंदिरात देण्यात येणारा प्रसाद हाही त्यातलाच भाग आहे. त्याविषयी धर्माधिकार्यांचे मत विचारात न घेता परस्पर पालट करणार्या जिल्हाधिकार्यांनी कधी मशिदींमधील प्रथा-परंपरा पालटण्याचे धाडस दाखवले असते का ? – संपादक)
Gujarat: Shaktipeeth Ambaji temple prasad changed from ‘mohanthal’ to ‘chikki’, devotees protest, give ultimatum of 48 hourshttps://t.co/CuSdpgnhZv
— OpIndia.com (@OpIndia_com) March 5, 2023
१. भाजपचे गुजरात राज्यातील माध्यम समन्वयक डॉ. यग्नेश दवे यांनी ट्वीट करून सांगितले की, एक ब्राह्मण असल्याच्या नात्याने माझी वैयक्तिक भावना आहे की, मोहनथाळ प्रसाद चालूच ठेवला पाहिजे.
२. मोहनथाळ प्रसाद विधवा आणि निराधार महिला यांच्याकडून बनवले जात होते. ‘मोहनथाळ बंद करण्यात आल्याने त्यांचा रोजगराचोही साधन गेले आहे’, असे सांगितले जात आहे.
३. काँग्रेसचे नेते आणि ब्रह्म समाजाचे नेते हेमांग रावल यांनी आरोप केला की, गेल्या २ वर्षांत मोहनथाळची किंमत वाढवण्यात येत होती. पूर्वी १० रुपयांना मिळणारी मोहनथाळ १२, १५, १८ आणि शेवटी २५ रुपयांना मिळू लागल्यानंतर ती बंदच करण्यात आली.
संपादकीय भूमिकामंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर याहून वेगळे काय होणार ? गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मोहनथाळ’ प्रसाद म्हणून दिली जात असतांना अचानक ती बंद करणे ही मोगलाईच होय ! हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |