कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्यांना अटक !
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक केली. तसेच जीवन, शिवांग, शीतल, जाबिन, राणाजी आणि एकाला कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे तैवानी भाषेत लिहिलेली पुस्तके सापडली आहेत. त्यांची चौकशी आतंकवादविरोधी पथक, गुप्तचर विभाग, सैन्य गुप्तचर विभाग आदी यंत्रणांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
कानपुर में मिला धर्म परिवर्तन का मामला
चाणक्यपुरी के मकान में चल रहा था धंधा
पुलिस ने मौके से कई दस्तावेज बरामद किए@kanpurnagarpol @Shyamtiwariknp pic.twitter.com/usPpqNKsEX— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) March 5, 2023
१. स्थानिक नागरिकांनी या सदनिकेत धर्मांतर होत असल्याची तक्रार केली होती. तसेच विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनीही येथे जाऊन पाहिले असता तेथे ५० हून अधिक महिला आणि पुरुष आढळले होते. विहिंपचे पदाधिकारी आनंद सिंह यांनी सांगितले की, येथे आम्हाला ख्रिस्ती धर्माची संबंधित साहित्य सापडले. येथे ८ ते १० जणांना हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती होण्यास सांगण्यात आले होते.
धर्मांतरण का धंधा! शादी के लिए सुंदर लड़की और नौकरी का लालच देकर धर्म परिवर्तन, दो गिरफ्तार#Kanpur #UttarPradesh https://t.co/MZDT5euLZS
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 6, 2023
२. सदनिकेत भ्रमणसंगणक सापडला असून त्यात धर्मांतराविषयीचे साहित्य सापडले. चौकशीत ज्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले अशा ४ जणांची माहिती मिळाली. त्यांनी धर्मांतर केल्याचे मान्य केले आहे. पोलीस आता अटक करण्यात आलेल्यांना अर्थपुरवठा कोण करत होता, याची चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिका
|