वडगाव हवेली (तालुका कराड) येथील ग्रामपंचायतच्या २ कोटी रकमेच्या पाईप आगीच्या भक्षस्थानी !
कराड, ६ मार्च (वार्ता.) – येथील वडगाव हवेली गावासाठी महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन अंतर्गत २४ घंटे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी रकमेच्या पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवार, ३ मार्च या दिवशी रात्री या पाईप आगीच्या भक्षस्थानी पडल्या. ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
सौजन्य द न्यूज लाइन
राज्यशासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर या पाईप प्राधिकरणाने १ मासापूर्वी गावात आणून ठेवल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी असलेल्या पाईपलाईनच्या साठ्याला ३ मार्चच्या रात्री एकच्या दरम्यान अचानक आग लागली. या वेळी अग्नीशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते; परंतु शर्थीचे प्रयत्न करूनही मोठी हानी झाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी या दुर्घटनेमुळे पाणी योजनेच्या कामावर परिणाम होणार आहे.