‘आरोग्य भारती’ कोल्हापूरच्या वतीने कोथळी येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन !
कोल्हापूर – महिला जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर आणि हिमालया आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. येथे ‘आरोग्य भारती’च्या जिल्हाध्यक्षा डॉ. अश्विनी माळकर यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या प्रसंगी हिमालयाच्या वतीने महिलांना औषध वाटप करण्यात आले. या वेळी ‘हिमालया’चे युवराज पाटील, अजित यादव, गावच्या सरपंच सौ. रूपाली पाटील, अंगणवाडीसेविका, मदतनीस, तसेच गावातल्या महिला उपस्थित होत्या.