उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार !
कसबा पोटनिवडणूक प्रचार प्रकरण
पुणे – कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. प्रचाराच्या काळात धर्माचा उल्लेख करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. कसबा पोटनिवडणुकीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
२३ फेब्रुवारी या दिवशी कसब्यामध्ये केलेल्या भाषणात ‘फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे’, असे तक्रारीत म्हटले आहे.