नालासोपारा येथील आगीत अग्नीशमन दलाचे २ कर्मचारी घायाळ !
नालासोपारा – येथील पूर्वेकडील एका घरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत अग्नीशमन दलाचे २ कर्मचारी घायाळ झाले आहेत; पण केवळ ‘पीपीई किट’मुळे त्यांचे प्राण वाचले आणि अनर्थ टळला. सुदैवाने या घरात कुणी नसल्याने अनर्थ टळला.
फायरमन राहुल पाटील आणि कुणाल तामोरे आगीच्या पहाणीसाठी घरात गेले. त्याक्षणी तेथील सिलिंडरचा स्फोट झाला. राहुल पाटील हे २२ टक्के भाजले असून कुणाल हे १२ टक्के भाजले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.