साधिका रुग्णाईत होण्यापूर्वी तिला चैतन्यमय प्रसाद देणारी गुरुमाऊली !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !
१. ‘मला सेवेनिमित्त एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मी खोलीतून निघण्यापूर्वी त्यांनी मला आवडेल तो प्रसाद घेऊन जाण्यास सांगितले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘चॉकलेट’चे मोठे पाकीट घेण्यास सांगणे
एकदा मी सेवेनिमित्त खोलीत गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू प्रतिदिन १ ‘चॉकलेट’ घेऊन जातेस ना ! आज मोठी पुडी घेऊन जा. पुढील काही दिवसांसाठी आजच घेऊन ठेव, म्हणजे तुला प्रतिदिन घ्यायला नको.’’ मी खोलीतून बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मला पुन्हा ‘चॉकलेट’चे एक मोठे पाकीट घेण्याची आठवण केली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘चॉकलेट’चे पाकीट देणे
मी प्रसादस्वरूप ‘चॉकलेट’चे १ पाकीट घेतल्यावर ते मला म्हणाले, ‘‘कोणते आवडते पाहूया ? म्हणजे पुढच्या वेळी हेच देता येईल.’’ त्यानंतर त्यांनी ते पाकीट स्वतःच्या हातात घेऊन पाहिले आणि म्हणाले, ‘‘हेच आवडते असे नाही ना ? कोणतेही चालते ना ?’’ त्यावर मी ‘‘हो’’ म्हणाले. त्यांनी ते पाकीट स्वतःच्या हातून मला दिले.
४. ‘साधिका सेवेला येऊ शकणार नाही’, हे जाणून ‘चॉकलेट’चे मोठे पाकीट देणे
त्याच दिवशी दुपारी ४ वाजता मला सर्दी झाली आणि ६.३० वाजल्यानंतर मला ताप आला. ‘त्या दिवशी नंतर मी आजारी पडणार आहे’, हे गुरुमाऊलीने आधीच जाणले होते. मला त्या आजारपणाच्या कालावधीत चैतन्य मिळावे; म्हणून त्यांनी मला चॉकलेटचे मोठे पाकीट दिले आणि सेवेची संधी देऊन पुढील काळासाठी चैतन्यही दिले. या माध्यमातून त्यांनी माझ्यावर कृपेचा वर्षावच केला.
५. साधकांची अशी काळजी केवळ अन् केवळ माझी गुरुमाऊलीच घेऊ शकते.
अशा माऊलीस्वरूप गुरुदेवांच्या चरणी एकच प्रार्थना आहे,
‘शेवटी तुम्हा हीच विनवणी ।
आश्रय द्या हो तुमच्या चरणी ।।’
– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |