मांसाहार करून देवदर्शन केल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका !
पुणे – शरद पवार यांनी पूर्वी एकदा मांसाहार केला म्हणून दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात गेले नव्हते, तर त्यांनी बाहेरूनच हात जोडले होते. सुप्रिया सुळे यांनाही त्यांचा हाच कित्ता गिरवायला पाहिजे होता. पुणे दौर्यात सुप्रिया सुळे या मांसाहार करून महादेवाच्या दर्शनाला गेल्या, असे सांगितले जाते. याचा अर्थ हिंदुत्वाच्या सूत्रावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद आहेत, ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे, असे वक्तव्य हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केले. त्यांनी पुढे म्हटले आहे की, सुप्रियाताईंनी पवारसाहेबांकडून हिंदु धर्म शिकून घ्यावा. इतका पुरोगामीपणा निदान जाहीरपणे करणे बरे नव्हे.
सुप्रिया सुळे यांनी ४ मार्च या दिवशी मांसाहारी भोजन करून देवस्थानांना भेटी दिल्याची टीका शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी फेसबूकवर पोस्टवर केली होती. यावर ‘माझा या विषयाचा अभ्यास नाही. विजय शिवतारे काय बोलले, मला माहिती नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.