नाशिक येथे नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांकडून हुल्लडबाजी !
|
नाशिक – प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. काही प्रेक्षक तर विजेच्या खांबावरही चढले होते. त्यांना विजेचा धक्का बसण्याचीही पर्वा नव्हती. अनुचित प्रकार घडू नये; म्हणून गौतमी पाटील हिने अर्धा घंटा आधीच कार्यक्रम आटोपला.
पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी कार्यक्रमाला झाली होती. काही तरुण बॅरिकेट्स तोडून आत घुसले. या वेळी आसंद्यांचीही तोडफोड करण्यात आली. गोंधळ झाल्याने लोक सैरावैरा धावू लागले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
संपादकीय भूमिकानैतिकतेचा र्हास झाल्याने विनाशाकडे वाटचाल करणारी आजची तरुणाई ! |