‘ट्विटर’ने ‘टिक’ची (खुणेची) संकल्पना चोरली !
|
मुंबई – नामांकित व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्ती यांच्या ‘ट्विटर’ खात्यासाठीच्या ‘टिक’ म्हणजेच खुणेच्या सेवेची संकल्पना चोरली आहे, असा आरोप करून ट्विटरसह त्याचे मालक इलॉन मस्क यांच्या विरोधात येथील पत्रकार रूपेश सिंह यांनी अंधेरी दंडाधिकार्यांसमोर फसवणुकीची तक्रार प्रविष्ट केली आहे.
१. ट्विटर आस्थापनाने सर्वसामान्य नागरिकांच्या ट्विटर खात्यांसाठी निळ्या खुणेची, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींच्या ट्विटर खात्यासाठी तपकिरी खुणेची संकल्पना सेवेत आणली होती; मात्र ही संकल्पना माझी असून ट्विटरने ती चोरली, असे रूपेश सिंह यांचे म्हणणे आहे.
२. त्यांच्यावर फौजदारी कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपासह स्वामित्व हक्क कायद्यांतर्गत सिंह यांनी कारवाईची मागणी केली आहे. ‘ट्विटर इंडिया’चे प्रमुख मनीष माहेश्वरी यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.