पुणे येथील भोरगिरीच्या ‘भोरगडा’वर ‘दुर्गपूजा’ सोहळा !
पुणे – ‘शिवाजी ट्रेल संस्था’ आणि ‘किल्ले भोरगिरी संवर्धन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा’ भोरगिरीच्या भोरगडावर २६ फेब्रुवारी या दिवशी पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपूजेचे हे २७ वे वर्ष आहे. या दिवशी महाराष्ट्रासह भारतातील १४१ हून अधिक गड-दुर्गांवर एकाचवेळी सरदार, संस्थानिक आणि राजघराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ‘दुर्गपूजा’ करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष सचीन तोडकर यांनी सांगितले की, दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी, सर्वसामान्य नागरिक आणि शिवभक्त गड-दुर्गांकडे आकर्षित व्हावेत. प्रत्यक्ष गडावर उपस्थित रहावेत. त्यांना गड-दुर्ग पहाण्याची आणि त्यातून नंतर त्यांच्यात दुर्ग संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने ‘शिवाजी ट्रेल संस्था’ प्रतिवर्षी फेब्रुवारीच्या शेवटी विविध गड-दुर्गांवर ‘दुर्गपूजे’चे आयोजन करते.