काशीच्या अनेक भागांत लावण्यात येत आहेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीची भित्तीपत्रके !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थकांचा प्रयत्न !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील अस्सी घाट ते सिगरा, लहरतारा, घंटीमिल आदी भागांत अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यावर हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात आली आहे. ही भित्तीपत्रके बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थकांनी लावल्याचे म्हटले जात आहे. पोलीस या भित्तीपत्रकांविषयी चौकशी करत आहेत.
बागेश्वर धाम के समर्थन में काशी में लगे पोस्टर , देश को हिंदू राष्ट्र घोषित किए जाने की मांगhttps://t.co/nBltmY1VMM
— Live VNS (@livevns) February 28, 2023
वाराणसी येथील धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे समर्थक आलोक योगी यांनी सांगितले की, काशीमध्ये १ सहस्रांहून अधिक समर्थक वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भित्तीपत्रके लावत आहेत. आम्ही त्याद्वारे केंद्र सरकारकडे मागणी करतो की, देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे.