भारत आता चीनऐवजी जपानकडून अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे आयात करणार !
नवी देहली – एम्.आर्.आय., अल्ट्रासोनिक आदी वैद्यकीय उपकरणे आता जपानकडून विकत घेतली जातील, असा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे. पूर्वी चीनकडून ही उपकरणे विकत घेतली जात होती. आता चीनच्या उपकरणांच्या तुलनेत अधिक चांगली उपकरणे मिळतील; कारण जपानच्या उपकरणांची गुणवत्ता चीनच्या उपकरणांच्या तुलनेत चांगली आहे. या निर्णयामुळे चीनला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे, तसेच भारताचा मित्र जपानला लाभ होणार आहे. कोरोनानंतर भारताने चीनकडून वैद्यकीय उपकरणे आयात करण्याच्या मागणीत ५७ टक्के वाढ केली आहे.
भारत का चीन को मेडिकल झटका: अब मेडिकल एमआरआई, अल्ट्रासोनिक जैसे उपकरणों का इंपोर्ट जापान से होगाhttps://t.co/0fCvsbLzai#Import #Japan pic.twitter.com/G4J47RItyN
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) March 5, 2023
आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी अमेरिका, ब्रिटन, भारत, सिंगापूर आदी देशांना चीनवर अवलंबून रहावे लागत आहे; कारण बहुतेक उपकरणे चीनमध्ये बनवली जातात. येत्या ५ वर्षांत चीनकडून ही उपकरणे आयात करण्याचे प्रमाण अल्प करून जपानकडून ती मागवण्यावर लक्ष्य ठेवण्यात आले आहे.