बिहारमधील प्रिया दास नावाच्या तरुणीने चुलीवर मनुस्मृति जाळून त्याद्वारे पेटवली सिगारेट !
सामाजिक माध्यमांतून घटनेचा व्हिडिओ प्रसारित
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नवी देहली – बिहारमधील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात एक तरुणी मनुस्मृति जाळतांना दिसत आहे. या व्हिडिओचे काही जणांकडून समर्थन करण्यात येत आहे, तर काही जणांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचे म्हटले आहे.
बिहार की प्रिया दास ने मनुस्मृति जलाकर मुर्गा पकाया और फिर जलती हुई मनुस्मृति से अपनी सिगरेट भी सुलगाई. खुलेआम अंबेडकरवादी हिंदुओ के पवित्र धर्म ग्रंथ को अपमानित कर रहे हैं लेकिन इन पर कोई कार्यवाई नहीं होती. यह हिंदुओ के मुंह पर तमाचा मारा जा रहा है. कोई मीडिया नहीं दिखाएगा. pic.twitter.com/aawDqZhILR
— Shubham Sharma (@Shubham_fd) March 4, 2023
या व्हिडिओतील तरुणी प्रिया दास हिच्या हातात सिगारेट आहे. ती चुलीजवळ बसली आहे. चुलीवर कोंबडीचे मांस शिजवण्यात येत आहे. तरणी तिच्या शेजारी भूमीवर ठेवलेली मनुस्मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळत्या मनुस्मृतीद्वारे तिच्या हातातील सिगारेट पेटवते. ती म्हणते की, मनुस्मृति जाळणे केवळ सांकेतिक घटना आणि तात्कालिक घटना आहे. याचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच स्पष्ट केला असून तो म्हणजे एक व्यक्तीच्या विरोधात नाही, तर पाखंड आणि ढोंगी विचारांवर वार करणे हा आहे.
संपादकीय भूमिका
|