सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !
परात्पर गुरु डॉक्टरांचे व्यक्तीमत्त्व हे आदर्श शिष्य, सर्वाेत्तम गुरु, थोर लेखक, विविध कलांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक, अध्यात्मजगतातील संशोधक, धर्मसंस्थापक, प्रभावी हिंदूसंघटक, हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुशोभित आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र साधक, शिष्य, संत, लेखक, कलाकार, संशोधक, राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरित्र मालिकेतील तिसरा खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. हा खंड परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक सामर्थ्य दर्शवणारा आणि ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी जिज्ञासू, हितचिंतक, साधक आदींना लाखमोलाचे दिशादर्शन करणारा असल्याने प्रत्येकाने तो संग्रही ठेवावा.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील तिसरा खंड !
ऑनलाईन खरेदीसाठी हा ग्रंथ ‘सनातन शॉप’च्या bit.ly/3EKiD55 या मार्गिकेवर उपलब्ध आहे. स्थानिक संपर्क : ९३२२३१५३१७ |
नूतन ग्रंथाचे मुखपृष्ठ
ग्रंथाचे मनोगत
‘आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ।।’, अशी श्री गुरूंची महती वर्णिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. जयंत आठवले यांचा ‘शिष्य’ म्हणून स्वीकार केल्यानंतर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! अवघ्या ३ वर्षांनीच गुरु सर्वांसमोर डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोडकौतुक गायला लागले. हे अधिकार, तसेच गुरु अन् काही संत यांनी डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गारही प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत. काही अन्य पंथीय संतांनीही डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक सामर्थ्य ओळखून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे, हेही विशेष ! यावरून डॉ. आठवले यांच्या असामान्य आध्यात्मिक विभूतीमत्वाचा परिचय होतो.
सध्या साधक आपत्काळाचे चटके सोसत असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यासाठी कार्यरत आहेत. प्रस्तुत ग्रंथामुळे साधकांची सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी असलेली श्रद्धा आणि भाव आणखी वाढेल. त्यामुळे आगामी भीषण आपत्काळात कितीही महाभयंकर संकटे ओढवली, तरी साधकांच्या अंतःकरणातून पुनःपुन्हा शब्द उमटत रहातील, ‘अरे, घाबरतोस कशासाठी ? प.पू. डॉक्टर आहेत ना !’ यासाठीच या ग्रंथात हे सारे आशीर्वाद आणि गौरवोद्गार आम्ही समाविष्ट केले आहेत. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व्यक्तीस्तोम माजवण्यासाठी किंवा व्यावसायिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून त्यांची महती वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे’, अशा हीन भावनेने याकडे कुणी पाहू नये.
गुरूंचे आशीर्वादच शिष्याचे सामर्थ्य आणि कीर्ती वाढवतात. गुरूंच्या आशीर्वादामुळे आजही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे दिव्य कार्य करत आहेत. इतकेच नव्हे, तर हे कार्य करणारे सहस्रो साधकही ते घडवत आहेत ! हे त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. शिष्याला गुरूंचे आशीर्वाद लाभण्यासाठी शिष्याची साधनाही तशीच तोलामोलाची असावी लागते. गुरूंप्रती संपूर्ण समर्पितभाव, गुरुकार्याची पराकोटीची तळमळ, समष्टी कल्याणाचा व्यापक विचार इत्यादी गुणांचा समुच्चय शिष्यात असावा लागतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात हे गुण असल्यामुळे त्यांना गुरूंचे आशीर्वाद लाभले आणि ते फलद्रूपही झाले ! यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साधना किती उच्च श्रेणीची होती, हे लक्षात येते. त्यांनी केलेली व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा संक्षिप्त गोषवाराही ग्रंथात मांडला आहे.
आतापर्यंत अनेक संत-महात्मे होऊन गेले. साधकावस्थेपासून ब्रह्मपदाच्या प्राप्तीपर्यंतच्या त्यांच्या साधनाप्रवासात त्यांच्या आंतरिक अवस्थांमध्ये घडलेले पालट, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी इतरांना काहीच कळू शकले नाही. संत अहंविरहित असल्याने स्वतःहून हे सर्व सांगतही नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मात्र साधकांना हे सर्व शिकता यावे, यासाठी ‘स्वतःच्या उन्नतीचे मोजमापन करता येईल’, अशी सूत्रे त्यांच्या साधकावस्थेपासून नोंद करून ठेवली, तसेच यासंदर्भात त्यांनी पुढे सनातनच्या ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले. ही सर्व अमूल्य माहितीही या ग्रंथात अंतर्भूत आहे. हे या ग्रंथाचे निराळेपण आहे.
वर्ष १९९० पासून गुरु वेगवेगळ्या प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक अधिकार सर्वांच्या लक्षात आणून देत असतांनाही तेव्हापासून आजपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्वतःला गुरूंचा शिष्यच समजतात आणि शिष्यभावानेच सनातनच्या आश्रमात रहातात ! हेही त्यांचे एक वैशिष्ट्यच आहे. अशा अत्युच्च कोटीतील संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचे भाग्य मिळायला जन्मजन्मांची पुण्याई असावी लागते. आपल्या सर्वांना हे भाग्य लाभले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा जन्म जणू केवळ साधकांच्या उद्धारासाठीच झालेला आहे. त्यांच्यासारखे गुरु आज संपूर्ण पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाहीत. आजपर्यंत साधकांवर आलेल्या सर्व संकटांच्या वेळी त्यांनीच साधकांची सर्वतोपरी काळजी घेतली आहे. ‘गुरु हाच भगवंत आहे. गुरूंसाठीच माझा जन्म आहे’, असा भाव साधकांनी ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यास साधकांचे घोर आपत्काळातही रक्षण तर होईलच, तसेच साधक मोक्षासही जातील. या ग्रंथाच्या माध्यमातून ‘सर्वांनाच अशी तळमळीने साधना करण्याची बुद्धी होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
(ग्रंथमालिका ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे चरित्र’ आणि उपमालिका ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’ यांची अधिक ओळख ‘साधनाप्रवास : खंड १’ यामध्ये दिली आहे.)
– (पू.) संदीप आळशी (१२.११.२०२२)