पुणे येथे ग्रामस्थांनीच घेतला श्रमदानातून रस्ता दुरुस्तीचा निर्णय !
आंबेगाव (जिल्हा पुणे) – येथील मोहरेवाडी फाटा ते बरकीदरा हा ३ कि.मी. रस्ता होऊन बरीच वर्षे उलटल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषदेला निवेदने देऊनही दुरवस्था झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच हा रस्ता श्रमदानातून दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. वर्ष २००४-०५ मध्ये जिल्हा परिषद निधीतून हा रस्ता सिद्ध केला होता. त्यानुसार २५ फेब्रुवारी या दिवशी या कामास आरंभ झाला. श्रमदानासाठी गावातील पुरुष, महिला, युवक आणि युवती सहभागी झाल्या होत्या.
संपादकीय भूमिकाप्रशासन आणि शासन यांची कामे जनतेला का करावी लागतात ? अशा कर्तव्यचुकार अधिकार्यांकडून रस्त्याचा खर्च सव्याज वसूल करावा ! |