दंगलींना पायबंद घालण्यासाठी धर्मनिष्ठ हिंदूंनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मतदानातून शक्ती प्रदान करणे आवश्यक !
भारतातील धार्मिक दंगली : समस्या आणि उपाय
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत. २६ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘उत्तरप्रदेशमध्ये २ मुसलमानांनी भगवा फेटा घालून हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी मजार फोडणे, देशात हिंदू सर्वाधिक असुरक्षित असतांना केली जाणारी कोल्हेकुई, हिंदूहित साधणार्यांना हिंदूंनी मतदान करणे आवश्यक आणि ‘काफिरांचा वध आणि त्यांची मालमत्ता लुटणे’, हे धर्मांधांच्या दृष्टीने धर्मसंमत असते, हे हिंदूंनी जाणणे आवश्यक’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ८)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/657277.html |
१. शस्त्रपूजन करणारा हिंदु समाज शस्त्रविहीन, तर मुसलमान शस्त्रसज्ज !
हिंदूंनी स्वतःची संघटित शक्ती दाखवण्याची खरी वेळ आता आली आहे. आपले वैयक्तिक क्षुद्र लाभ आणि भेद अजूनही बाजूला सारून हिंदु, बौद्ध, जैन अन् शीख हे स्वतःची अभेद्य एकजूट दाखवत नसतील, तर काळ त्यांना क्षमा करणार नाही. या सोबतच हिंदूंनी आपला पौराणिक, प्राचीन, आर्वाचीन इतिहास आणि वारसा यांचे विस्मरण होऊ देता कामा नये. पौराणिक काळातही या देशात अजिंक्यता आणि अमरता यांचे वरदान लाभलेले महाभयंकर अन् मायावी असुर होऊन गेले. प्रत्येक काळात सज्जनांनी एकत्र येऊन त्या असुरांचा पूर्णतः निःपात केला. असुरांचा वध करण्यासाठी देवीदेवतांनाही अवतार स्वरूपात जन्म घ्यावे लागले. विशेष म्हणजे हिंदूंच्या सर्व देवता या विविध अस्त्रे आणि शस्त्रे यांनी सज्ज अशा आहेत. हिंदूंची कोणतीच देवता शस्त्रहीन नाही. विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची फार प्राचीन परंपरा आपल्या भारतात आहे; पण विरोधाभास असा की, शस्त्रपूजन करणारा हिंदु समाज आज शस्त्रविहीन झाला आहे. इस्लामचा अर्थ ‘शांती’ असा सांगणारे मुसलमान शस्त्रसज्ज झाले आहेत. एका हातात कुराण आणि दुसर्या हातात तलवार (शस्त्र) घेऊनच इस्लामच्या अनुयायांनी जगभर इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार केला. हिंदूंनी ही वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे.
२. मुसलमानांचा संघटितपणा आणि त्यांच्याकडून केले जाणारे धर्माचे मूलभूत आचरण
काही गोष्टी हिंदूंनी मुसलमानांकडून शिकण्यासारख्या आहेत. शत्रूमध्ये काही सद्गुण दिसत असतील, तर ते ग्रहण करण्यास मागे-पुढे पाहू नये. मुसलमान गरीब असो कि श्रीमंत, लहान असो कि मोठा, सुशिक्षित असो कि अशिक्षित, स्त्री असो कि पुरुष, ते सर्वजण धर्मानिष्ठ असतात. आपल्या धर्मातील काय योग्य आणि अयोग्य ? याची चिकित्सा ते स्वतः करत नाहीत आणि इतरांनी केलेली चिकित्सा अथवा टीका ते सहन करत नाहीत. ते देशांच्या सीमा मानत नाहीत. जगातील एका कोपर्यात रहाणार्या एखाद्या मुसलमानावर अन्याय झाला, तरी त्याच्या विरोधात जगातील सर्व मुसलमानांकडून प्रतिक्रिया उमटते. मुसलमान धर्माचे ५ मूलभूत आणि आधारभूत सिद्धांत किंवा स्तंभ आहेत –
अ. शहादा म्हणजे कलमा पढणे.
आ. नमाज : दिवसांतून ५ वेळा ईश्वराची प्रार्थना करणे आणि प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थना करणे.
इ. रोजा (उपवास) : रमजान मासात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही न खाता उपवास करणे. यानिमित्ताने ईश्वराशी निकटता साधणे.
ई. जकात : प्रत्येक कमाई करणार्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील ४० वा भाग आपल्या धर्मातील गरीबांसाठी दान करणे.
उ. हज : जीवनात एकदा तरी हज यात्रा करणे.
३. स्वधर्माचा अभ्यास न करता अवमान करण्यात धन्यता मानणारे आत्मघातकी हिंदू
मुसलमानांच्या या ५ आधारभूत सिद्धांतांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या आचरणाचा विचार केला, तर काय चित्र दिसते ?
हिंदू आपल्याच धर्माच्या देवीदेवता, श्रद्धास्थाने, प्रथा आणि परंपरा यांवर वाटेल तशी अवमानजनक टीका करतात. इतर धर्मियांनी टीका केली, तर त्याला ते हसून दाद देतात. आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धर्मातील प्रथा, परंपरा, सण यांवर टीका करणे किंवा इतरांनी केलेली टीका हसण्यावर नेणे, ही नपुंसकता आहे. आपणच आपल्याला हीन समजत असू, तर इतर धर्मीय आपला काय सन्मान करणार ?
आपण ज्या धर्मात जन्मलो, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे. जर अभ्यास केला, तर त्यांना समजून येईल की, हिंदु धर्म अत्यंत वैज्ञानिक आहे. हिंदु धर्म हा जगातील एक सर्वश्रेष्ठ धर्म असून मानवाने कसे जगावे ? याचे अचूक मार्गदर्शन करणारी ती एक जीवनपद्धत आहे. हिंदूंचा प्रत्येक सण-उत्सव, प्रथा आणि परंपरा यांमागे विज्ञान, काही सामाजिक संदेश; समाज, निसर्ग, ईश्वर यांच्याविषयीची कृतज्ञता, मनुष्याची शारीरिक सुदृढता, मनोविज्ञान इत्यादी अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. रा.स्व. संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांच्या एका लेखात म्हणतात, ‘‘आपली सनातन संस्कृती आपल्याला सुसंस्कृत सद्भावना आणि भावपूर्ण आचरणाचे ज्ञान देते. मनाच्या शुद्धतेपासून पर्यावरणाच्या शुद्धतेपर्यंत सगळ्यांचे ज्ञान वाढवायला साहाय्य करते.’’ या सर्व गोष्टी समजून न घेता हिंदूंनी आपलाच धर्म, संस्कृती यांवर टीका करणे किंवा इतर धर्मियांनी केलेली टीका सहन करणे, हा शुद्ध मूर्खपणा आणि आत्मघात आहे.
४. कुठे धर्माचरण करून संघटित रहाणारे मुसलमान आणि कुठे हिंदूंच्या दुर्दशेतून धडा न घेणारा हिंदु समाज !
प्रत्येक मुसलमान दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतो. आपल्यापैकी किती हिंदू दिवसातून एकदा तरी घरातील देवघरासमोर जाऊन देवासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतात ?
प्रार्थनेमधील सामर्थ्याची कल्पना किती हिंदूंना आहे ? समाज, देश आणि धर्म यांचे कल्याण, त्यांचे हित अन् त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना या देशातील कोट्यवधी हिंदूंनी नित्यनियमाने केली, तर पुष्कळ पालट घडू शकतो; पण आमच्यातील लाखो हिंदूंना स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात अभिमान वाटतो. मुसलमानांमध्ये नावालाही नास्तिक माणूस सापडणार नाही. सर्व मुसलमान नमाजाची वेळ झाली की, हातातील काम सोडून मशिदीमध्ये सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्रित होतात. त्यामुळे त्यांच्यात एकीची आणि आपुलकीची भावना निर्माण होते. हिंदू कधी आठवड्यातून एकदा तरी एखाद्या मंदिरात एकत्रित होऊन सामूहिक प्रार्थना करतात का ? त्यामुळे एका गल्लीत राहूनही हिंदू एकमेकांना ओळखतही नाहीत. मग त्यांची एकी होणे, परस्परांविषयी आपुलकी वाटणे, ही पुष्कळ दूरची गोष्ट झाली. प्रत्येक शुक्रवारी मुसलमान समाज मशिदीत एकत्रित होत असल्यामुळे त्यांच्यात बंधूभाव निर्माण होतो. मग एका मुसलमानाच्या हाकेसरशी सहस्रो मुसलमान रस्त्यावर उतरतात. हिंदू मात्र स्वतःच्या घराला झळ पोचत नाही, तोपर्यंत अन्य हिंदूंच्या साहाय्याला रस्त्यावर उतरत नाहीत. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या दुर्दशेतून कोणताही धडा घ्यायची सुबुद्धी अद्यापही हिंदू समाजाला होत नाही. मग बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या दुर्दशेविषयी तो काय प्रतिक्रिया देणार ?
‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५ – म्हणजे धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.) हे सूत्र हिंदु समाज विसरून गेला आहे.
५. दंगलखोरांना हिंदूंचा धाक न वाटण्यामागील खरे कारण !
रमजान मासात सर्व मुसलमान समाज रोजा म्हणजे उपवास ठेवतो. त्या समाजातील अगदी लहान मुलेही उपवास करतात. ‘अल्लाशी म्हणजे धर्माशी निकटता साधणे’, हा यामागचा उद्देश असतो. भारतीय संस्कृतीत, तर पुष्कळ पूर्वीपासूनच उपवासाचे महत्त्व सांगितले आहे; पण किती हिंदू उपवास करतात ? यामुळे ते ईश्वरापासून नव्हे, तर धर्मापासून दूर जातात. अगदी श्रावण मासात मांसाहार न करण्याचे पथ्यही हिंदूंमधील अनेक जण पाळत नाहीत. उलट श्रावण मासातही मांसाहार करण्याचे समर्थन करणारे अनेक महाभाग हिंदु समाजात आहेत. अशा वर्तणुकीमुळे आपल्या धर्मातील कट्टरता तर सोडून द्या; पण अशा लोकांकडून आपल्या धर्माचा आदर होईल, अशी अपेक्षाही करणे व्यर्थ असते. असे अधर्मी लोक स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याची शक्यता नसते. त्यामुळे आपल्या श्रद्धास्थानांची कितीही अवहेलना झाली, तरी हिंदू रस्त्यावर उतरून स्वतःचे शक्तीप्रदर्शन करण्यास अल्प पडतो. त्याचा परिणाम असा होतो की, दंगलखोरांना हिंदूंचा धाक वाटत नाही. या देशात ६० टक्के हिंदू असे आहेत की, त्यांचा ना देशाशी ना स्वधर्माशी काही संबंध असतो. पैसा कमवणे, खाणे-पिणे, मौजमजा करणे यातच त्यांचे आयुष्य संपून जाते.
६. हिंदूंचे धर्मांतर होण्यामागील कारण आणि धर्मरक्षणासाठी हिंदूंनी करावयाची कृती
मुसलमान समाजातील कमवणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील ४० वा भाग आपल्याच धर्मातील गरिबांसाठी दान करत असतो. तन, मन दान करणे तर सोडून द्या; पण हिंदू समाजातील कमवणार्यांपैकी किती जण आपल्या धर्मातील निर्धनांसाठी किती धनाचे दान करतात ? हिंदू समाजामध्ये २ वेळा पोटभर जेवू न शकणार्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत, अशा निर्धन हिंदूंना आपल्या धर्माविषयी अभिमान कसा वाटेल ? तो स्वधर्माच्या रक्षणासाठी कसा पुढाकार घेईल ? उलट असे निर्धन हिंदू अन्य धर्मांच्या प्रलोभनाला सहजपणे बळी पडण्याची शक्यता अधिक असते. ‘एक हिंदू आपला धर्म सोडून अन्य धर्मात जातो, याचा अर्थ हिंदूंची संख्या एकाने न्यून होते’, असे नाही, तर यामुळे ‘हिंदूंच्या शत्रूंच्या संख्येत एकाने वाढ होते.’ आपला हिंदु समाज या वास्तवाचा कधी विचार करणार ? हिंदु उद्योगपती, व्यावसायिक, उच्चपदस्थ, नोकरदार आणि पुढारी यांच्या तिजोर्या पैशाने ओसंडून वहात आहेत. ते आपल्याच धर्मातील निर्धनांसाठी कधी त्याग करणार ?
७. धर्मनिष्ठ पिढी घडवण्यासाठी मुसलमानांकडून केले जाणारे प्रयत्न आणि हिंदूंची दुःस्थिती !
मुसलमान समाजातील मुलांना लहानपणापासून धार्मिक शिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्मनिष्ठ आणि धर्माभिमानी होतात. हिंदु समाजातील लहान मुलांना आपल्या धर्माची संस्कृतीची शिकवण देण्याची कुठे व्यवस्था आहे का ? शालेय अभ्यासक्रमात संतसाहित्य, गीता, महाभारत, रामायण यांचा समावेश करण्याचा कुणी विचार बोलून दाखवला की, लागलीच ‘शिक्षणाचे भगवेकरण’, अशी ओरड चालू होते. दुर्दैवाने ही ओरड करणारे बहुसंख्येने हिंदूच असतात. लहान वयातील मुले अत्यंत संस्कारक्षम असतात. या वयात त्यांच्यावर झालेले संस्कार आजन्म कायम रहातात. दुर्दैवाने या देशातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रावर पूर्णपणे ख्रिस्त्यांनी एकाधिकार स्थापन केला आहे. कॉन्व्हेंटमधून या मुलांना ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली जाते. पाश्चात्त्य रितीरिवाज शिकवले जातात. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा असल्यामुळे हिंदूंची मुले स्वधर्म, स्वसंस्कृती आणि आपली मातृभाषा या सर्वांपासून केवळ दूरावतात, असे नाही, तर पूर्णपणे अपरिचित रहातात. प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक मशिदीमध्ये नमाजासाठी जमलेल्या सर्व लहान मोठ्या वयाच्या मुसलमानांना मौलवींकडून धार्मिक कट्टरता आणि एकता यांची शिकवण दिली जाते. हिंदूंच्या किती मंदिरात धर्माचार्य आणि पुरोहित यांच्याकडून हिंदूंना आपल्या धर्माची माहिती देऊन त्यांना धर्मानिष्ठ बनवण्याचा प्रयत्न केला जातो ? काही मोजके धर्माचार्य आणि पुरोहित सोडले, तर बाकी पोटभरू धर्माचार्य, पुरोहित, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्याकडून हिंदु धर्मातील काही काल्पनिक भाकडकथा सांगून श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते. श्रोत्यांच्या मनात आपल्या धर्माचा अभिमान रूजवण्याऐवजी अधिकाधिक गल्ला जमवणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.
८. हिंदु युवतींवर संस्कार न झाल्याने लव्ह जिहादचे षड्यंत्र फोफावणे
मुसलमान धर्मातील स्त्रियांना त्यांच्या धर्मातील कट्टर धर्ममार्तंडांच्या दबावामुळे बुरखा आणि हिजाब घालणे बंधनकारक आहे. या प्रथांचे कुणी समर्थन करणार नाही. मात्र त्याच वेळी हिंदू समाजातील तरुण मुलींनी ‘स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार’, असा जो घेतला आहे, त्याचेही समर्थन करता येणार नाही. हिंदू स्त्रियांचे अनिर्बंध आचरण, आई-वडिलांचे दुर्लक्ष अन् घरातील संस्कारांचा अभाव यांमुळे प्रतिवर्षी सहस्रो हिंदू मुली मुसलमानांच्या लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. चित्रपट आणि दूरदर्शनच्या वाहिन्या ही मनोरंजनाची क्षेत्रे कट्टर मुसलमानांच्या हातात एकवटली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात खानांचा एकाधिकार स्थापन झाला आहे. चित्रपट आणि दूरदर्शनच्या हिंदी मालिकांमध्ये काम करणार्या सर्व मुसलमान नायकांच्या बायका हिंदु आहेत अन् त्या आता कट्टर मुसलमान मानसिकतेच्या बनल्या आहेत. चित्रपट असो किंवा मालिका नायक सर्व मुसलमान असतात; पण नायिका मात्र आवर्जून हिंदूंची निवडली जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून चालू असलेले हे षड्यंत्र अद्यापही हिंदूंच्या लक्षात येत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ९. साम्यवाद्यांनी शिक्षण आणि इतिहास यांद्वारे हिंदुद्वेष्टी पिढी सिद्ध करणे जवळपास ५० वर्षे या देशावर काँग्रेसचे राज्य होते. काँग्रेसच्या राजवटीत काँग्रस पक्षाला अडचणीच्या वेळी साहाय्य करून साम्यवाद्यांनी (कम्युनिस्टांनी) या देशातील उच्च शिक्षण आणि इतिहास लेखनाचे क्षेत्र आपल्या कह्यात घेतले. साम्यवाद्यांनी या देशातील हिंदु धर्म, सभ्यता आणि संस्कृती यांचा कायमचा द्वेष केला. आपल्या देशातील प्राचीन ऐतिहासिक आणि अर्वाचीन थोर पुरुष अन् विचारवंत यांपेक्षा त्यांची कार्ल मार्क्स, लेनिन अशा परकीय विचारवंतांवर अधिक श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी या देशाच्या इतिहासाचे पूर्णतः विकृतीकरण करण्याचे दुष्कर्म चोखपणे पार पाडले. त्यामुळे या देशातील तरुणांच्या अनेक पिढ्या परधार्जिण्या वृत्तीच्या बनल्या. त्यांना आपला हिंदु धर्म, त्यातील आचार-विचार, देशाचा इतिहास, सणवार निरर्थक वाटू लागले. असे ‘ब्रेन वॉशिंग’ झालेले हिंदू कधीही हिंदूंच्या बाजूंनी उभे रहात नाहीत आणि या देशातील सत्तेसाठी लाचार झालेले राजकीय नेते, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी अन् विकाऊ विद्वान यांच्याविषयी काय बोलावे ?
१०. हिंदुद्वेष्टे घटक हिंदूंसाठी ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ !
काहींचा जन्म केवळ हिंदु धर्मात झाला; म्हणून त्यांना हिंदु म्हणावे लागते. असे सहस्रो नेते सत्ता, संपत्तीसाठी, परकीय पैशावर पोसले जाणारे विकाऊ विद्वान आणि ढोंगी निरपेक्षतावादी आदी सर्व या देशातील हिंदू अन् त्यांचा धर्म, या देशाची प्राचीन सभ्यता, साहित्य आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी उतावीळ झालेले आहेत. हे हिंदुद्वेष्टे घटक हिंदूंसाठी ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ झाले आहेत. या देशात धर्मांध मुसलमानांकडून सातत्याने भडकावल्या जात असलेल्या दंगली त्यात हिंदूंची होत असलेली अपरिमित हानी, जीवित आणि वित्त हानी, हिंदूंच्या अमानुषपणे होत असलेल्या कत्तली, हिंदु देवीदेवता अन् श्रद्धास्थाने यांची होत असलेली अवहेलना, आपल्याच मातृभूमीत विस्थापित, असुरक्षित आणि भयभीत झालेला हिंदू यांविषयी हे हिंदुद्वेष्टे आपल्या तोंडातून निषेधाचा एक शब्दही कधी उच्चारत नाहीत. मग यांच्याकडून हिंदूंना अनुकूल असणार्या प्रत्यक्ष कृतीची काय अपेक्षा करणार ? मला या हिंदुद्वेष्ट्या घटकांना त्यांच्या आजच्या मौनामुळे भविष्यात त्यांचे काय होणार ? ही वास्तविकता दर्शवणार्या कवितेच्या दोन ओळी उद्धृत कराव्या वाटतात, ‘‘अधर्मपर मौन रखकर जो मात्र निहर जाते हैं । भीष्म हो, द्रोण हो, या कर्ण सब मारे जाते हैं ।’’ (अधर्मावर मौन ठेवून असणारे बुडतात. भीष्म असो, द्रोण असो वा कर्ण असो सर्व मारले जातात.)
या देशातील सातत्याने होणार्या धार्मिक दंगलींना पायबंद घालायचा असेल, तर हिंदु समाजाने आपल्या मनात काही वज्रसंकल्प केले पाहिजेत. दंगलखोरांना त्यांच्याच भाषेत समेजल, असे वैध मार्गाने उत्तर देण्याची सिद्धता त्याने केली पाहिजे. यासाठी सर्व भेद आणि वाद विसरून संघटित अन् धर्मनिष्ठ झाले पाहिजे. आपल्याच धर्मातील अस्तनीतील सापांना ठेचण्यासाठी केवळ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनाच मतदानाच्या माध्यमातून शक्ती प्रदान केली पाहिजे.
(क्रमशः)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ. (९.१.२०२३)
या लेखाचा पुढील वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/661767.html
संपादकीय भूमिकास्त्रियांचे अनिर्बंध आचरण, आई-वडिलांचे दुर्लक्ष अन् घरातील सुसंस्कारांचा अभाव यांमुळे प्रतिवर्षी सहस्रो युवती लव्ह जिहादच्या बळी ! |