चीनने पाकिस्तानला पुन्हा दिले ४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीन पाकिस्तानला पुन्हा एकदा कर्ज देणार आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी ही माहिती दिली. दार म्हणाले की, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने ४ सहस्र कोटी रुपयांच्या कर्जाला संमती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा घसरत चाललेला परकीय चलनसाठा पुन्हा वाढण्यास साहाय्य होईल. हे पैसे ३ हप्त्यांंमध्ये दिले जातील. आम्ही कधीही कंगाल नव्हतो आणि कधीही होणार नाही. परकीय चलनाचा साठा ‘सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तान’मध्ये केवळ ३ आठवड्यांच्या आयातीसाठी शिल्लक आहे. याआधीही चीनने आम्हाला परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी कर्ज दिले आहे.
Amid Pakistan economic crisis, China gives loan of $700mn to Pakistan, US expresses concern #pakistancrisis #unitedstate #china #ITVideo @PoojaShali pic.twitter.com/SmSJMkLpHs
— IndiaToday (@IndiaToday) February 25, 2023
संपादकीय भूमिकापाकिस्तान आता अशाच प्रकारच्या भिकेवर जगणारा देश म्हणून काही मास ओळखला जाईल आणि नंतर त्याचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपुष्टात येईल, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही ! |