ब्रिस्बेनच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर लिहिण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !
ऑस्ट्रेलियात हिंदु मंदिरावर खलिस्तानवाद्यांचे पुन्हा आक्रमण
ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांच्या घटना सातत्याने चालू आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यास ऑस्ट्रेलियातील सरकार अपयशी ठरले आहे; कारण येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण करून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणा लिहिल्या आहेत. गेल्या २ मासांतील मंदिरांवर आक्रमण करण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी २१ फेब्रुवारीला रात्री ब्रिस्बेनमधीलच भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी झेंडा फडकावण्यात आला होता.
Australia: Shree Laxmi Narayan Temple in Brisbane vandalised, Khalistan supporters blame Indian National Congress for the attackhttps://t.co/HjKNJyEOsz
— OpIndia.com (@OpIndia_com) March 4, 2023
ऑस्ट्रेलियात हिंदु धर्म हा तिसरा सर्वांत मोठा धर्म !
वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियामध्ये ६ लाख ८४ सहस्र हिंदू रहातात. हे तेथील लोकसंख्येच्या २.७ टक्के आहे. शीख सुमारे २ लाख ९ सहस्र आहेत. ते एकूण लोकसंख्येच्या ०.८ टक्के आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे ! |