‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !
कोल्हापूर – मार्केड यार्ड परिसरात चालू असलेल्या ‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करत डावे, पुरोगामी, अंनिस यांनी ३ मार्चला महोत्सवस्थळी मोर्चा काढण्याचे घोषित केले होते. या विरोधात एकत्र येत हिंदुत्वनिष्ठांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. या महोत्सवास विरोध करून धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यात करण्यात आली होती. अखेर ३ मार्चला मोर्चाचा कांगावा करत अल्प संख्येने उपस्थित असणारे डावे, पुरागामी यांना पोलिसांना कह्यात घेतले. दुसरीकडे महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत असून यज्ञस्थळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित रहात आहेत.
१. कृष्णगिरी शक्तीपिठाधिपती राष्ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सुवर्णभूमी लॉन, शिरोली पथकर नाका येथे ‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सव’ चालू असून हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होत आहे.
२. याला मिळणारा प्रतिसाद पाहून कथित अंधश्रद्धेचे कारण पुढे करत डावे, पुरोगामी यांनी ३ मार्चला मोर्चा काढण्याचे घोषित केले होते. याला हिंदुत्वनिष्ठांनी संघटिपणे विरोध करत शाहूपुरी पोलीस ठाण्यात निवेदन दिले. शुक्रवार, ३ मार्चला सर्वश्री संभाजी साळुंखे, सूरज चव्हाण, राहुल कदम, संतोष माने, मसणाजी पाटील (नांदेड), विजय गुळवे, विजय आरेकर, सनी पेनकर, भोला पोवार यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, कार्यकर्ते महोत्सवस्थळी उपस्थित होते.