देवद येथील मागणी पुरवठा विभागातील साठा पडताळणीची सेवा समयमर्यादेत पूर्ण व्हावी, यासाठी पुढील सूचनांचे पालन करा !
‘१० मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत देवद आश्रमात मागणी-पुरवठा विभागात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्रे, नामपट्ट्या आणि उत्पादने यांची प्रत्यक्ष साठा पडताळणी केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने ३१.३.२०२३ पर्यंत वरील सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत साठ्याची इतरत्र देवाण-घेवाण केल्यास पडताळणीच्या सेवेत अडचण येऊन सेवा पूर्ण व्हायला विलंब होऊ शकतो. त्यामुळे सर्वत्रचे जिल्हासेवक आणि वितरक यांनी शक्यतो या कालावधीत ग्रंथ, उत्पादने आदींची मागणी पाठवण्याचे टाळावे.
या कालावधीमध्ये समाजातून तातडीने आवश्यक ग्रंथ, लघुग्रंथ, नामपट्ट्या आदींची मागणी आल्यास जिल्हासेवकांनी संबंधित उत्तरदायी साधकांशी संपर्क साधावा. या संदर्भातील सूचना जिल्ह्यांना यापूर्वीच पाठवण्यात आली आहे.’ (२.३.२०२३)