बुलढाणा येथे इयत्ता १२ वीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली !
बुलढाणा – येथील सिंदखेडराजामध्ये इयत्ता १२ वीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली. परीक्षेच्या पूर्वीच अर्धा घंटा अगोदर सकाळी १०.३० वाजल्यापासून ही प्रश्नपत्रिका सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाली होती. ही प्रश्नपत्रिका कुणी फोडली ? यामागे कुणाचा हात आहे ? यात कोणती यंत्रणा कार्यरत आहे का ? याचे अन्वेषण चालू आहे. याविषयी प्रशासनाकडून पोलिसात गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.
धक्कादायक! परीक्षेपूर्वीच फुटला 12 वी चा गणिताचा पेपर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल https://t.co/UfPTJ1jZbG #HSCExam #HSCExamPaper #PaperLeak #बारावीपरीक्षा #पेपरलिक
— ETVBharat Maharashtra (@ETVBharatMA) March 3, 2023
संपादकीय भूमिकाशिक्षण क्षेत्रातील गलथान कारभार ! |