लागवडीच्या संदर्भातील कृतींच्या लिखित नोंदी ठेवाव्यात !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
लेखांक ८८
‘लागवडीतील प्रत्येक कृतीच्या लिखित नोंदी ठेवल्यास त्याचा पुष्कळ लाभ होतो. बियाणी पेरल्याचा दिनांक आणि उगवण चालू झाल्याचा दिनांक यांची नोंद ठेवावी; तसेच रोपवाटिकेतून एखादे नवीन रोप आणल्यास त्याच्याही दिनांकाची नोंद ठेवावी. ‘भाजीपाल्यासाठी वाफा कधी बनवला ? लागवड किती दिवसांनी केली ?’, असेही सर्व तपशील लिहून ठेवावेत. या नोंदी पुढील लागवडीच्या वेळी उपयोगी पडतात. ‘एखाद्या भाजीची किती रोपे लावल्यावर किती किलो उत्पादन मिळाले ?’, यांच्याही नोंदी ठेवल्या, तर ‘आपल्या कुटुंबासाठी किती लागवड करावी लागेल ?’, याचा अंदाज येतो. ‘जीवामृत घालणे, ते फवारणी करणे’, अशा नित्याच्या कृतींचीही नोंद ठेवल्यास ‘त्या कृतींमध्ये सातत्य आहे का ?’, हे अभ्यासता येते. या सर्व नोंदी करण्याच्या समवेतच शक्य तेव्हा रोपांच्या वाढीच्या विविध अवस्थांतील छायाचित्रेही काढावीत.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१७.२.२०२३)