(म्हणे) शेजारील देशाला होत असलेल्या शस्त्रपुरठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता ! – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार
भारतावर नाव न घेता टीका !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एका बैठकीत ऑनलाईन बोलतांना भारतावर नाव न घेता टीका केली. शेजारी देशाला होत असलेल्या पारंपरिक आणि अपारंपरिक शस्त्रांच्या पुरवठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण होईल. ती पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असा दावा त्यांनी केला.
Hina Rabbani Khar says the largest country in the region continues to be a beneficiary of nuclear exceptionalism.@HinaRKhar
Read more: https://t.co/sJyJMKi2pT pic.twitter.com/TpIq5pGiJX— Daily Times (@dailytimespak) March 3, 2023
रब्बानी यांनी पुढे म्हटले की, शेजारी देशावर होणारे हे उपकार सुरक्षेच्या दृष्टीने तणाव निर्माण करत आहेत. हा देश हिंसेची भावना अधिक भक्कम करणारा आहे. यामुळे कोणत्याही वादावर शांतता निर्माण करण्याचे मार्ग बंद होत आहेत. आम्ही संयम आणि दायित्व यांचे पालन करत आहेत; (यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक) मात्र आम्ही आमच्या सुरक्षेसाठीच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
संपादकीय भूमिकागेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ? |