गड-दुर्गांच्या दुर्दशेला कारणीभूत घटक !
• सरकार आणि प्रशासन यांची अनास्था
• पुरातत्व विभागाची उदासीनता
• नागरिकांमध्ये गडसंवर्धनाविषयी असणारी अनभिज्ञता
• ऐतिहासिक वारशांविषयी जागृती केली न जाणे
• गड-दुर्गांकडे ऐतिहासिक स्थळाऐवजी पर्यटनक्षेत्र म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित झालेली असणे
• गड-दुर्गांवर मद्य किंवा अन्य मेजवानी केली जाणे
• गड-दुर्गांच्या माध्यमातून ज्वलंत आणि धगधगता इतिहास जागृत ठेवण्याची उर्मीच नसणे
• गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी देण्यात येणारा निधीचा तुटवडा
• वारसारूपी वैभवाचे जतन करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव
♦ गड-दुर्गांच्या दुःस्थितीच्या माध्यमातून शिवरायांचा ज्वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्याला पुनर्झळाळी मिळण्यासाठी सर्वंकष स्तरावर प्रयत्न व्हावेत !