गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
सातारा, २ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील गड-दुर्गांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. गड-दुर्गांच्या रक्षणासाठी महामोर्चाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समिती करत असलेला हा एक अत्यंत चांगला प्रयत्न आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार भोसले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ मार्च या दिवशी मुंबई येथे काढण्यात येणार्या गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचे निमंत्रण देण्यात आले.