मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेसळयुक्त पदार्थांच्या अभिषेकामुळे भेग !
आयआयटी मुंबईच्या अहवालातील माहिती
मुंबई – येथील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेग पडली आहे. आयआयटी मुंबईच्या अहवालातून हा प्रकार समोर आला. त्यामुळे तेथे भाविकांना तेथे अभिषेक करण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. (भाविकांना अभिषेक करण्यावर बंदी घालणे, हा येथे पर्याय नसून त्यांना अभिषेक करण्यासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हा पर्याय आहे. प्रशासनाला ते उपलब्ध करून देणे अडचणीचे वाटते का ? – संपादक) भेसळयुक्त अबीर, गुलाल, भस्म, कुंकू, चंदन, दूध अर्पण केल्याने शिवलिंगाला भेग पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
१. बाबुलनाथ मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. राजा भीमदेव यांनी हे मंदिर बांधले होते. मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले; पण वर्ष १७८० मध्ये मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.
देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग पडली आहे.https://t.co/QxxYwjXitK
— Saamana (@SaamanaOnline) March 1, 2023
२. ‘श्री बाबुलनाथ मंदिर धर्मादाय संस्थे’चे अध्यक्ष नितीन ठक्कर म्हणाले, ‘‘कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० मासांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे, असे मंदिरातील पुजार्यांच्या लक्षात आले.
मुंबई के मशहूर बाबुलनाथ मंदिर में शिवलिंग में दरार#Mumbai #Babulnath pic.twitter.com/eMRPVx1KSQ
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) February 28, 2023
त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी बाँबेकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ते शिवलिंगाच्या संवर्धनाविषयी सल्ला देणार आहेत. त्याचा अहवाल मार्चपर्यंत येईल. बाबुलनाथ मंदिरावर मुंबईकरांची श्रद्धा आहे. शिवलिंगाविषयी आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत. ते जतन करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्यात येतील.’’