हिंदूंवर अन्याय करणार्या ‘वक्फ’ कायद्यांसारखे अन्य सर्व कायदे रहित करा ! – आनंदराव काशीद
कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
कोल्हापूर – ‘वक्फ बोर्डा’ला अमर्याद अधिकार देऊन हिंदूंची भूमी बळकवायला देणार्या वक्फ कायद्यांसारखे हिंदूंवर अन्याय करणारे सर्व कायदे सरकारने रहित करावेत. आपले श्रद्धास्थान असलेल्या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्या देवस्थानांच्या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा काशिद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी केले. कोल्हापूर येथे १ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलत होते.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिरोली येथील भाजपचे श्री. सतिश पाटील, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शिरोली येथील श्री. उत्तम पाटील, हुपरी येथील श्री. प्रवीण पाटील, ह.भ.प. विठ्ठल (तात्या) पाटील, निगवे येथील
श्री. आदित्य कराडे, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, श्री. राहुल कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात केलेल्या मागण्या
१. श्री जोतिबा देवस्थानाची ४०० एकर भूमी विक्री झाल्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांविषयी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सविस्तर खुलासा करावा, तसेच या प्रकरणात सखोल अन्वेषण होऊन खरोखरच असा प्रकार झाला असल्यास जे लोक आणि शासकीय अधिकारी सहभागी असतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश शासनाने द्यावेत.
२. ‘वक्फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा.