दैनिक ‘सनातन प्रभात’मधील कु. स्मितल भुजले यांना आलेल्या भगवान शिवाच्या संदर्भातील अनुभूती वाचतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘१४.२.२०२३ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी कु. स्मितल भुजले यांना भगवान शिवासंदर्भात आलेल्या अनुभूती वाचल्या. मी या आधीही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांना आलेल्या अनुभूती वाचल्या आहेत. त्या वेळी मला पुढील सूत्रे जाणवली.
१. कु. स्मितल यांच्या अनुभूती वाचतांना मी भावस्थितीत असते आणि मला भावानंद अनुभवता येतो.
२. ‘त्यांनी अनुुभवलेला प्रत्येक प्रसंग मीही अनुभवत आहे,’ असे मला जाणवते.
३. सध्याच्या रज-तमात्मक वातावरणात मला भावस्थितीत रहाणे कठीण जाते; मात्र स्मितल यांच्या अनुभूती वाचतांना मी सहजतेने भावाच्या स्थितीत जाते. त्यांच्या अनुभूती वाचल्यानंतर मला बराच वेळ शांतीची अनुभूतीही येते.
४. त्यांच्या अनुभूती वाचतांना त्यांचे भावाचे प्रयत्न आणि त्यांची भगवान शिवाप्रती भक्ती जाणवते. तेव्हा माझे मन तृप्त होते.
५. माझा स्मितल यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नसूनही त्यांच्या अनुभूती वाचून मला त्यांच्याविषयी जवळीक वाटते.
‘कु. स्मितल यांच्यासारखे भावजागृतीचे प्रयत्न माझ्याकडून करून घ्यावेत. माझी ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ वाढवावी’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. इंद्राणी कुलकर्णी, पुणे (१४.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |