कुत्र्याने बाळाला रुग्णालयातून नेऊन फाडून खाल्ले !
जयपूर (राजस्थान) – राज्यातील सिरोही येथे एका भटक्या कुत्र्याने तेथील रुग्णालयात असलेल्या एका मासाच्या बाळाला फाडून खाल्ल्याची भयावह घटना नुकतीच घडली. मूल त्याच्या आईसह रुग्णालयात निजले होते. तेव्हा कुत्र्याने त्याला तोंडात धरून नेले. आईला हे लक्षात आल्यावर ती त्याच्यापाठी धावली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. (भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना भटक्या कुत्र्यांची ही समस्या जनतेच्या जिवावर बेतणे शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक) सिरोहीचे आमदार संयम लोढा यांनी हे सूत्र राजस्थान विधानसभेत उपस्थित केले असून संबंधित रुग्णालयाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.