विवाह करणे किंवा न करणे यांपेक्षा आनंदी रहाणे अधिक आवश्यक ! – श्री श्री रविशंकर
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या बेंगळुरू येथील आश्रमात जाऊन मुक्काम केला. तेथे त्यांनी सहस्रोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या समोर श्री श्री रविशंकर यांना विचारले, ‘लग्न करणे खरेच आवश्यक असते का ?’ यावर त्यांनी दिलेले उत्तर फार सुंदर आणि प्रत्येकाने आवर्जून ऐकावे असे आहे.
श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तुम्ही हा प्रश्न मला विचारत आहात ? असे असते, तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. लग्न केलेच पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. आनंदी रहाणे अधिक आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यात आनंदी कसे रहाल, या गोष्टीचा विचार करा. प्रत्येक व्यक्तीचा आनंद वेगवेगळा असतो. काही लोक लग्न करूनही दु:खी, तर काही लोक लग्न न करताही दु:खी असतात. दुसरे लोक असतात की, जे लग्न न करताही आणि काही लग्न करूनही खुश असतात. दुसर्यांनाही ते आनंद देत असतात. तुम्हाला काय आवडते ? मला वाटते की, आनंदी रहाण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा. तुम्ही ज्या परिस्थितीत आनंदी रहाल ती परिस्थिती स्वीकारा.’’
(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’, २३.२.२०२३)