वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या कार्यक्रमांची अनुमती शिक्षणाधिकार्यांकडून रहित !
|
कुडाळ – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आणि महाराष्ट्र शासनाचा ‘जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ यांविषयी शाळांमधून विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आलेली अनुमती रहित करण्यात आल्याचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले आहे. त्यामुळे तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोंडस नावाखाली विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून देशाच्या भावी पिढीला नीतीमूल्यांपासून दूर नेणे, त्यांच्या मनातील देव, धर्म, संत, धर्मग्रंथ आदी श्रद्धास्थानांवर आघात करून त्यांना ‘नास्तिक बनवणे’ या छुप्या हिंदुद्वेषी धोरणाला चाप बसला असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने असे कार्यक्रम शाळांमधून आयोजित करण्यास शिक्षण विभागाकडून अनुमती दिली गेल्याचे समजल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुस्ताक शेख, निवासी उपजिल्हाधिकारी आयुषकुमार सोनाने, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना निवेदन देण्यात आले होते. अशा कार्यक्रमांमुळे यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीची सोदाहरण माहिती या निवेदनात देण्यात आली होती.
त्यामुळे ‘अशा कार्यक्रमांना अनुमती दिली असल्यास ती रहित करण्यात यावी, अन्यथा कार्यक्रमांत शाळांमधून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर टीकाटिपणी झाल्यास निर्माण होणार्या परिस्थितीला प्रशासन उत्तरदायी राहील’, अशी चेतावणी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे याविषयी केलेल्या उचित कार्यवाहीचे लेखी पत्र समितीला द्यावे, अशीही मागणी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे करण्यात आली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कार्यक्रम आयोजित करण्यास दिलेली अनुमती रहित करण्यात आल्याचे पत्र िजल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना पाठवल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी हिंदु जनजागृती समितीला पत्राद्वारे कळवले आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|