सर्वाेच्च न्यायालयाकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना देश-विदेशांत ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा आदेश
सुरक्षेचा खर्च अंबानी यांच्याकडून घेण्याचेही निर्देश
नवी देहली – मुकेश अंबानी यांना केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर जगभरात सर्वोच्च दर्जाची, म्हणजे ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणार्या अर्जावरील सुनावणीच्या वेळी दिला. मुंबई आणि महाराष्ट्र येथे ही सुरक्षा पुरवण्याचे दायित्व राज्य सरकारचे असेल, तर भारतभर अन् जगात जिथे जिथे ते जातील, त्या सर्व ठिकाणी ती सुरक्षा पुरवण्याचे दायित्व केंद्रीय गृहमंत्रालयाचे असेल. केवळ मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याचे दायित्व अल्प खर्चिक असले, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
सुप्रीम कोर्ट ने केंद्र को मुकेश अंबानी और उनके परिवार को भारत और विदेश में Z+ सुरक्षा देने का निर्देश दिया https://t.co/TSBd5m1HgR
— Takshakapost (@takshakapost) March 1, 2023
मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची ३ मुले आकाश, अनंत आणि इशा यांना आलेल्या धमकी प्रकरणातील मूळ कागदपत्रे अन् पुरावे सादर करण्याचे निर्देश नुकतेच त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या प्रकरणी केंद्राकडून विशेष सुटीकालीन याचिकाही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली काढत याविषयी अंतिम आदेश दिला आहे.