मुलांनी हॉलिवूडचा चित्रपट पाहिल्यास त्यांना ५ वर्षांची, तर पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा !
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन
सेऊल – हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने हे चित्रपट पहाणार्या मुलांना ५ वर्षांची, तर त्यांच्या पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने केली. यासाठी त्याने कायदाच केला आहे.
This country will imprison children, their parents for watching #Hollywood films.https://t.co/DDanFkwUhz
— TIMES NOW (@TimesNow) February 28, 2023
काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन, तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. ‘के-ड्रामा’ नावाने ओळखले जाणारे दक्षिण कोरियन चित्रपट पहाणे आणि त्यांचा प्रसार करणे, हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा देण्यात आली होती.