सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या भेटीत सोलापूर येथील कु. सावित्री गुब्याड यांना आलेल्या अनुभूती !
१. पू. सौरभ जोशी यांनी साधिकेचे नाव घेऊन तिला हाक मारणे आणि त्या वेळी तिला भावाश्रू येणे
‘आम्ही सर्व साधक सनातनचा रामनाथी येथील आश्रम पहात असतांना आम्हाला कृतज्ञता वाटत होती. आम्ही सनातनचे विकलांग संत पू. सौरभदादा (पू. सौरभ जोशी) यांना भेटायला गेलो. तेव्हा सर्व साधक त्यांना स्वतःची ओळख करून देत होतेे. मी माझी ओळख सांगितल्यावर पू. दादांनी त्यांच्या चैतन्यमय वाणीने मला ‘सावित्री’, अशी हाक मारली. तेव्हा माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले आणि ते भेट संपेपर्यंत थांबलेच नाहीत. पू. दादांनी ‘हसा’, असे सांगितल्यावर मला कृतज्ञता वाटली.
२. ‘पू. सौरभदादा यांच्या आईच्या माध्यमातून गुरुमाऊलीच पू. दादांची काळजी घेत आहेत’, असे वाटून भावजागृती होणे
पू. दादांच्या आईंनी (सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी) सांगितले, ‘‘पू. दादा गेली २६ वर्षे पलंगावरच झोपून आहेत. त्यांना शरीर हालवता येत नाही.’’ पू. दादांची शारीरिक क्षमता नसल्याने त्यांच्या आईच त्यांची काळजी घेतात. तेव्हा ‘सौ. जोशीकाकूंच्या माध्यमातून स्वतः साक्षात् गुरुमाऊलीच पू. दादांची काळजी घेत आहेत’, असे मला वाटलेे आणि ‘गुरुमाऊली प्रत्येक जिवाची किती काळजी घेतात !’, हे लक्षात येऊन माझी भावजागृती झाली.
३. पू. दादांच्या चरणांना स्पर्श केल्यावर ‘गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करत आहे’, असे मला वाटले.
४. पू. दादांचा सर्व साधकांविषयीचा प्रेमभाव !
४ अ. पू. दादा सर्व साधकांशी हसत हसत आणि गमतीने बोलत होते. त्यांनी त्यांच्या आईंना आम्हा सर्व साधकांना खाऊ देण्यास सांगितले. तेव्हा सौ. जोशीकाकूंनी सांगितले, ‘‘साधक भेटायला आल्यावर पू. दादांना पुष्कळ आनंद होतो. ते त्या साधकाला लवकर सोडतच नाहीत. तेे त्याच्याशी बोलतच रहातात.’’ तेव्हा ‘पू. दादांचा साधकांप्रती किती प्रेमभाव आहे !’, हे मला शिकायला मिळाले.
४ आ. आम्ही निघतांना ‘आता आम्ही जाऊ शकतो का ?’, असे विचारल्यावर ते काहीच बोलले नाहीत. जोशीकाकू म्हणाल्या, ‘‘या सर्व साधकांना इथेच रहाण्याची इच्छा आहे.’’ तेव्हा अगदी प्रेमाने हसत हसत ते आम्हाला ‘बसा’, असे म्हणाले. तेव्हासुद्धा त्यांना पुष्कळ आनंद झाला होता.
५. पू. सौरभदादांच्या चैतन्यमय भेटीने भुकेचा विसर पडणे
पू. दादांना भेटायला जायच्या आधी मला पुष्कळ भूक लागली होती. मी पू. दादांनी दिलेला प्रसाद खाल्ला आणि त्यांना भेटून खोलीबाहेर आले. पू. दादांच्या भेटीमुळे इतके चैतन्य आणि आनंद मिळाला होता की, भेटीच्या आधी मला लागलेली भूक नाहीशी झाली. ‘पू. दादांमधील चैतन्यानेच माझे पोट भरले आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
‘वरील सर्व सूत्रे केवळ गुरुदेवांच्याच कृपेने मला अनुभवता आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. सावित्री गुब्याड (वय १८ वर्षे), सोलापूर (९.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |