कणेरी मठ येथे ५० पेक्षा अधिक गायी मृत्यूमुखी पडल्या नसून केवळ १२ गोवंशियांचा मृत्यू ! – जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त
पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक देणारा जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांचा खुलासा !
कोल्हापूर – कणेरी मठ येथे ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ चालू असतांना प्रसारमाध्यमांद्वारे, तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चुकीची खोडसाळ वृत्ते पसवण्यात आली होती. त्यात ५० पेक्षा अधिक गायी मृत्यूमुखी पडल्या आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यात कसलेही तथ्य नसून आजअखेर केवळ १२ गोवंशीय मृत्यूमुखी पडले आहेत. ५२ गोवंशीय बाधित झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए. पठाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गायी मृत्यूमुखी प्रकरणात विषबाधेचा कोणताही अंश नाही !या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गायी मृत्यूमुखी पडल्यावर त्या संदर्भातील अहवाल नमुने पडताळणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्याच्या निष्कर्षामध्ये जठररस, खाद्यांश यांचा ‘पी.एच्.’ ३ ते ३.५ पर्यंत अतीआम्लीय असून विषबाधेचा कोणताही अंश सापडलेला नाही. सद्यःस्थितीत परिस्थिती आटोक्यात आहे; पण तरीही २ साहाय्यक आयुक्त, २० पशूधन विकास अधिकारी, १५ पशूधन पर्यवेक्षक सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. |