वसंत ऋतूमध्ये निरोगी रहाण्यासाठी सोपे उपाय
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५८
‘ज्याप्रमाणे आईस्क्रीम शीतकपाटातून बाहेर काढून ठेवल्यासच पातळ होते, त्याप्रमाणे हिवाळा संपून वसंत ऋतू चालू झाला की, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे शरिरातील कफ वितळून पातळ होतो. यामुळे वसंत ऋतूच्या आरंभी सर्दी, खोकला, ताप, दमा, त्वचेचे विकार यांसारखे कफाचे विकार वाढतात.
नियमित व्यायाम करणे, सकाळी १० वाजेपर्यंत काही न खाणे, भूक लागल्यावरच खाणे, रात्री ८ वाजेपर्यंत जेवणे आणि पुरेशी झोप घेणे एवढ्याच गोष्टींचे पालन केले, तरी वसंत ऋतूमध्ये होणार्या विकारांना प्रतिबंध होऊ शकतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२३)
♦ या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या ♦
_____________________________