प्रेमभाव, नम्रता आणि परिपूर्णतेचा ध्यास असलेले श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क !
पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) हिला इंग्रजी सत्संगाच्या चित्रीकरणाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. श्वेता शॉन क्लार्क यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
१. प्रेमभाव
‘इंग्रजी बालसत्संगाच्या चित्रीकरणाच्या वेळी बालसाधकांकडून काही चूक झाल्यास शॉनदादा आणि श्वेताताई त्यांना प्रेमाने समजावून सांगत होते. त्यामुळे बालसाधकांना काही अडचणी आल्यास ते त्यांना मोकळेपणाने सांगू शकायचे.
२. परिपूर्णता
‘सेवा परिपूर्ण व्हावी’, अशी दोघांचीही तळमळ होती. एखादा शब्द योग्य पद्धतीने उच्चारला गेला नाही, तर ते आमच्याकडून त्या शब्दाचा पुनःपुन्हा सराव करून घेत होते.
३. नम्रता
शॉनदादा आणि श्वेताताई दोघेही आमच्यापेक्षा सेवेतील कौशल्य अन् अनुभव यांमध्ये पुष्कळ मोठे आहेत, तरीसुद्धा त्यांचे वागणे आणि बोलणे यांत मोठेपणा नव्हता. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये नम्रता होती.
४. नियोजनकौशल्य
शॉनदादा आणि श्वेताताई यांचे चित्रीकरण सेवा अन् बालसाधकांच्या सरावांचे नियोजन परिपूर्ण असल्यामुळेे त्यांची अल्प कालावधीत परिणामकारक सेवा होत होती.
५. कृतज्ञता
गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), तुमच्याच कृपेमुळे शॉनदादा आणि श्वेताताई यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
-कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे. (२.१.२०२२)