श्री अय्यप्पा स्वामींचा अवमान करणार्या नास्तिकतावादी नेत्याची जमावाकडून धुलाई !
पोलिसांच्या वाहनात घुसून मारहाण
हनमकोंडा (तेलंगाणा) – श्री अय्यप्पा स्वामींविषयी आक्षेपार्ह विधाने करून त्यांचा अवमान करणारा ‘भारत नास्तिक संघा’चा तेलंगाणा राज्य अध्यक्ष आणि नास्तिकतावादी नेता बैरी नरेश याला जमावाने पोलिसांच्या वाहनात घुसून धुलाई केली. या प्रकरणी पोलिसांनी आक्रमण करणार्या सर्वांना अटक केली आहे. श्री अय्यप्पा स्वामी यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी ३१ डिसेंबर २०२२ या दिवशी नरेश यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
बैरी नरेश सातत्याने हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करत असल्यामुळे त्याच्या विरोधात लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे याअधीही त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. नरेश याच्या विरोधात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यात २०० हून अधिक तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
This is Bairi Naresh who insulted Ayyappa Swamy getting rightful treatment from Hindus in Telangana🔥 pic.twitter.com/8u7shRLrFJ
— Viक़as (@VlKASPR0NAM0) February 28, 2023
बैरी नरेश हा हमनकोंडा येथील एका विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होता. तेथे त्याला काही लोक मारहाण करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. घाबरलेल्या नरेश याने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तात्काळ येऊन नरेश याला संरक्षण देत पोलिसांच्या वाहनात बसवले. तोपर्यंत संतप्त जमाव तेथे पोचला आणि जमावाने नरेश याला पोलिसांच्या वाहनात घुसून मारहाण केली.
T’gana | Bairi Naresh,Pres,Atheist Association,allegedly made derogatory remarks against Lord Ayyappa Swami at a meeting held in Kodangal y’day
Devotees have filed complaints against him in 3 police stations in Hyd
VHP demands invocation of Preventive Detention Act against him pic.twitter.com/IW0luTTixe
— ANI (@ANI) December 30, 2022
संपादकीय भूमिकाअसे प्रकार सर्वत्र होऊ नयेत, यासाठी सरकारने देवतांचा अवमान रोखण्यासाठी तात्काळ कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते ! |