हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या पाद्र्याला अटक !
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यातील भालूवाही येथे गरीब हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणारा पाद्री सुजीत कुमार आणि त्याचे २ महिला साथीदार टिना विश्वकर्मा अन् शिवानी पाल यांना पोलिसांनी अटक केली. (बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा ! – संपादक)
पोलीस या परिसरात नियमित गस्त घालत असतांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना ‘कांतीदेवी यांच्या घरातील सदस्यांचे धर्मांतर केले जात आहे’, अशी माहिती दिली. त्याची नोंद घेत पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी हिंदूंचे धर्मांतर रोखत या तिघांना अटक केली. या परिसरात रहाणारा एका शाळेचा मुख्याध्यापक हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रक्रियेत सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे. तो सुजीत कुमार या पाद्र्याला हाताशी धरून ‘मुलांना चांगले शिक्षण देऊ’, ‘नियमित धान्य देऊ’, अशी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याची माहिती पुढे येत आहे.