भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी न्यायालयात मागणी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यास पुरातत्व विभागाने नकार दिला आहे. सरकार भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यास सिद्ध आहे. यासाठी शासन न्यायालयामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करून मागणी करणार आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी सभागृहात माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिला शाळा चालू केली. या ठिकाणी स्मारक उभारण्याविषयी आमदार चेतन तुपे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
Foundation stone of Bhide Wada national monument to be laid in two months, says Maharashtra CM Eknath Shinde https://t.co/rIRLk01efp
— TOI Cities (@TOICitiesNews) January 3, 2023
या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. याविषयी पुणे महानगरपालिकेला स्मारकाचा आराखडा सिद्ध करून शासनाला सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.