श्री. अपूर्व ढगे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकाविषयी केलेले चिंतन आणि प्रयोग !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला स्वयंपाक करण्याविषयी संशोधन करायला सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘तुझ्या मनात केवळ स्वयंपाकाविषयी संशोधन करण्याच्या दृष्टीने विचार असायला हवेत. पदार्थामध्ये सत्त्व, रज आणि तम हे गुण असतात. तुझ्या मनात ‘पदार्थ सात्त्विक कसा करायचा ?’, असा विचार असला पाहिजे.’’ त्यानंतर ‘गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे कसे करायचे ?’, असा विचार माझ्या मनात चालू झाला. तेव्हा त्यांनीच माझ्याकडून करून घेतलेले चिंतन येथे दिले आहे.
१. पदार्थाची सात्त्विकता वाढवण्यासाठी प्रत्येक कृती सात्त्विक करण्याचा प्रयत्न करणे
‘पदार्थांमधील रज-तम न्यून करून पदार्थ अधिकाधिक सात्त्विक होण्यासाठी कसे प्रयत्न करायचेे ? पदार्थ करतांना आपली विचारप्रक्रिया कशी असली पाहिजे ?’ असे विचार माझ्या मनात सतत येऊ लागले. गुरुदेवांनी ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे सांगितले आहे. त्यानुसार ‘आपल्याला पदार्थ सात्त्विक बनवायचा असेल, तर आपले आचरणही सात्त्विक असले पाहिजे’, हेे माझ्या लक्षात आले. त्यानंतर पदार्थ सात्त्विक बनवण्याच्या दृष्टीने विविध सूत्रे माझ्या लक्षात येऊ लागली. मी ती सूत्रे प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न चालू केला.
२. ‘देवाशी अनुसंधान असतांना आणि नसतांना स्वयपांक करणे’ या संदर्भात केलेला प्रयोग !
स्वयंपाक करतांना ‘देवाशी अनुसंधान असतांना आणि नसतांना काय जाणवते ?’, याविषयी मी एक प्रयोग केला. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
३. कृतज्ञता
वरील प्रयोग करतांना देवाने मला पुष्कळ अनुभूती दिल्या. त्यानंतर एखादा पदार्थ करण्यासाठी कराव्या लागणार्या सेवा करतांना, उदा. स्वच्छता, पूर्वसिद्धता इत्यादी करतांना किंवा प्रत्यक्ष पदार्थ करतांना अधिकाधिक देवाशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न होऊ लागला. ‘या प्रयोगातून मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि ते दैनंदिन जीवनात आचरणात आणता आले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. अपूर्व प्रसन्न ढगे (हॉटेल मॅनेजमेंट पदवीधर), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |